माजी आमदार वैभव नाईक यांनी केले डांगी कुटुंबियांचे सांत्वन…

आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि पोलिसांची चर्चा करणार..

कुडाळ,ता.१०:-
महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत डांगी कुटुंबियांचे सांत्वन केले. डांगी कुटुंबियांना कंत्राटदाराकडून व वीज वितरण विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि पोलीसांशी चर्चा करणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, तुषार परब,निलेश सावंत,रुपेश निकम,बाबी निकम,विजय परब, बाळकृष्ण नेवगी, हरिश्चंद्र सावंत, गुरु पंधारे,अमर आपणकर, साई कविटकर, सचिन कविटकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top