पुणे आळंदी येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सुयश…
वेंगुर्ला,ता.१०ः-
तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत उपविजेता पदावर नाव कोरले.
सदर स्पर्धा सई तापकीर द रॉयल पेजेंट प्रोडक्शन यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे यांनी उपविजेते मिळत कोकणचा डंका बजावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.