बांगलादेश हिंदू न्याय यात्रा सभेत आ नितेश राणे यांचे आवाहन.
ओरोस,ता.१०: बांग्लादेशातील हिंदू, बौध्द समाजावर तेथील मुस्लिम अत्याचार, छळ करीत आहेत. परंतु त्या देशातील नागरिक आपल्याकडे राहत आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर तुम्ही आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. बांगलादेशातील आपल्या देशात राहत असलेल्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. येथून त्यांनी आपल्या देशात फोन करून ‘अरे काय करताय, आम्हाला उद्याचा दिवस दिसणार नाही वाटतो’, असे सांगितले पाहिजे. असे बांगलादेशी नागरिकांना इशारा देणारे भाषण आ नितेश राणे यांनी बांगलादेश हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत हिंदूंना संबोधित करताना केले.