मालवण,ता.११:
प्लास्टिक पिशवी बंदीबाबत मालवण नगरपालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून आज मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार फिरत्या पथकांद्वारे मालवण शहरातील व्यापारी व विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशवी जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे १५० किलो एवढया वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन २१ हजार ९०० रुपये एवढ्या रक्कमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
