शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केली घोषणा…
सिंधुदुर्गनगरी,ता. १७:
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी सलीम तकीलदार यांची निवड झाली आहे. या निवडीची घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीत केली.महाराष्ट्र शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बैठक शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या हस्ते ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली. या बैठकीला राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, कोकण विभागाचे लक्ष्मण वालगुडे, नूतन कोकण कार्याध्यक्ष सलीम तकिलदार, शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव नंदन घोगळे, कुडाळ तालुका अध्यक्ष सुरेश उर्फ सचिन कुडाळकर, यांसह शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी सलीम तकीलदार यांना कोकण कोकण विभाग कार्याध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. श्री. तकीलदार हे सध्या साळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. तर अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सचिवपदी यशस्वीरित्या काम केले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र यावेळी राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू,कोकण विभाग सचिव लक्ष्मण वालगुडे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव नंदन घोगळे, कुडाळ तालुकाध्यक्ष सुरेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. शिक्षक परिषद संघटना जोमाने वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वांचे सहकार्य घेऊन संघटनेसाठी जास्त वेळ देऊन ती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन. कोकण हा शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला अबाधित राहील, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी सलीम तकलदार यांनी उपस्थितांना दिले. या निवडीनंतर सलीम तकीलदार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.