कणकवली पर्यटन महोत्सव ९ जानेवारी ते १२ जानेवारी कालावधीत होणार..

कणकवली,ता.१७:

शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्‍सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, फुड फेस्टिव्हल, भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमांची मांदियाळी असणार आहे अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top