मालवणात वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेच्या वतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावणे उपक्रम..

मालवण,ता. १७:-
वाइल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला. एक पाऊल भटक्या जनावरांपासून अपघात घडू नये म्हणून अशा उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, डाॅ प्रसाद धुमक, सल्लागार सौ. शिल्पा यतीन खोत, संदीप चिऊलकर, दीपक दुतोंडकर, कृष्णा कदम, प्रविण सरकारे, पर्यावरण प्रेमी प्राणीमित्र आनंद बांबार्डेकर व स्वप्निल परुळेकर, अंकिता मयेकर, मनिषा पारकर, शांती तोंडवळकर, महेश वालीकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top