कुडाळ प स मार्फत २१ पासून लोकसहभागातून बंधारा मोहीम…

२७ डिसेंबरला बंधारा दिनाचे आयोजन:आठवडाभरात १ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट.

कुडाळ,ता.१७:
तालुक्यात दरवर्षी लोकसहभागातुन वनराई/कच्चे बंधारे बांधले जातात. गेल्या सात वर्षांपासून राबविण्यात येणार हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे. यंदा सुद्धा कुडाळ पंचायत समितीमार्फत दि २१ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ हा आठवडा बंधारे बांधण्याची विशेष मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने २७ डिसेंबर हा दिवस बंधारा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top