कुडाळ
कुडाळ कविलकाटे येथिल श्री.सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दिनांक २२.०१.२०२६ रोजीमंदिरात साजरा होत आहे.यंदाचे हे -२८ वे,वर्ष आहे. या निमित्त श्री.सिद्धीगणपती कविलकाटे देवस्थान च्या वतीने तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ४ते ७ वाजेपर्यंत सद्गुरु श्री वामनराव पै जीवनविद्या मिशन तर्फे नामस्मरण,हरिपाठ व प्रवचन (कविलकाटे शाखा) सायंकाळी ७.०० वा.श्री.सिद्धीगणपती ची आरती,रात्रौ ८.०० वा. श्री सिध्दीगणपती प्रासादिक भजन मंडळ कविलकाटे यांचे सुश्राव्य भजन,बुवा श्री. सिध्दार्थ पावसकर,रात्रौ ९.०० वा.श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, बांबुळी.बुवा श्री. सुशांत बांबुळकर यांचे सुश्राव्य भजन.रात्रौ १०.०० वा. बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतार नाट्यमंडळ, कवठी, यांचा नाट्यप्रयोग – प्रारब्ध.(सौजन्य : सौ. सुवर्णा बाळा पेडणेकर, कविलकाटे)
बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ सायं. ६.३० वा. आरती,सांय. ७.०० वा. श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कविलकाटे (मधलीवाडी) बुवा श्री. प्रभाकर (बाळ) गडेकर यांचे सुश्राव्य भजन. रात्रौ ८.०० वा.स्थानिक मुलांचे रेकॉर्ड डान्स
गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ पहाटे ५.०० वा. : श्री. व सौ. सुवर्णा बाळा पेडणेकर उभयतांकडून श्रींची पाद्यपूजा सकाळी ६ ते ९ वा.: जीवन विद्या मिशन तर्फे,श्री गणेश नामस्मरण.सकाळी १०.०० वा. ह.भ.प.श्री. लक्ष्मण नेवाळकर,बुवा यांचे गणेश जन्मावर सुश्राव्य किर्तन,दुपारी १२.०० वा. : श्री गणेश जन्म सोहळा महाआरती,सामुदायिक प्रार्थना आणि गाऱ्हाणे.दुपारी १.०० वा. : महाप्रसाद.दुपारी २.०० वा. स्थानिक सुश्राव्य भजने.दुपारी ३.०० वा. : महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम सांय. ३.३० वा. श्री देवी चांमुडेश्वरी महिला फुगडी मंडळ, कविलकाटे यांची फुगडी.सायं. ४.३० वा. :श्री देव सिध्दीगणपती महिला फुगडी मंडळ, कविलकाटे यांची फुगडी.सायं. ५.३० वा. : श्रींची महाआरती.सायं. ६.०० वा.खानोलकर दशावतार नाट्यमंडळ,खानोली.संचालक : बाबा मेस्त्री प्रस्तुत नाट्यप्रयोग “चैत्र पौर्णिमा” रात्रौ १०.०० वा :गोव्यातील सुप्रसिध्द श्री साई दामोदर,घुमट आरती मंडळ,मडगांव गोवा यांचा कार्यक्रम.गायक – श्री. शुभम नाईक यांचा घुमट आरती व गायन कार्यक्रम.(सौजन्य : श्री. आशिष गुरुनाथ जळवी व श्री.स्वप्निल प्रभाकर जळवी) असे तीन दिवशीय कार्यक्रम कविलकाटे येथील श्री.सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त आयोजिन केले आहेत तरी या कार्यकर्माचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन,श्री.सिद्धीगणपती मंदिर देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.
