विशाल परबः शिरोडा येथे आयोजित फोर्ज क्लासिक 2026 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला उस्फुर्त प्रतिसाद…
वेंगुर्ला
आजच्या धकाधकीच्या युगात शरीरसौष्ठव जपणे ही काळाची गरज असून, परमेश्वराने दिलेल्या या देणगीची योग्य ती जपणूक करणे हा युवकांचा धर्म आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांनी केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने शिरोडा येथे आयोजित फोर्ज क्लासिक 2026 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनच्या दिमाखदार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ मिळावे, आरोग्याबाबत जागृती व्हावी यासाठी अशा भव्यदिव्य स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या सर्व मंडळींचे त्यांनी मनापासून कौतुक केले.यावेळी व्यासपीठावर मनोज उगवेकर (माजी सरपंच, शिरोडा), हितेन नाईक (सावंतवाडी युवा मोर्चा अध्यक्ष), राहुल राऊळ व फोर्ज क्लासिक मित्रमंडळ परिवार सदस्य, राजन राऊळ व मित्र परिवार, शिवाजी जाधव, प्रितेश नाईक, अभिषेक सावंत, उद्धव चिपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
