बांदा प्रतिनिधी
बांदा (गडगेवाडी) येथील रहिवासी सुभाष जयदेव बांदेकर गेली वर्षभर शासन दरबारी माझ्या निवासस्थानी पायवाट मिळावी यासाठी मागणी करत होतो.मात्र शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर लाक्षणिक उपोषण करणार आहेत
यासाठी 21 /12/ 2025 पालकमंत्री यांनाही पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती.याची प्रत मा. पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.तहसीलदार ,गट विकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी,मा.सरपंच,ग्रामविकास अधिकारी यांना दिली होती. अद्याप पर्यंत मला न्याय मिळण्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही.
शासनाकडे अशी तरतूद असताना मला माझ्या निवासस्थानी जाण्यासाठी अटकाव केला जातो. एकतर रस्त्याची तरतूद आहे.तेथून निवासस्थाना पर्यंत जाण्यास प्रशासनाकडून पायवाट मोकळी करण्यात यावी.अशी अर्जदार सुभाष जयदेव बांदेकर यांच्याकडून प्रशासनाकडे मागणी करण्यात आली
