जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार:पालकमंत्री नितेश राणें

कणकवली
भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महायुती जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी दिसते; मात्र एका जागेसाठी अनेक इच्छुक असणे स्वाभाविक आहे. उबाठा पक्षासारखी परिस्थिती आमची नसून उमेदवार शोधण्याची गरज आम्हाला पडत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे ना. नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top