शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत बिबट्या वन्यप्राणी सापडल्याने आरोपींना १४ दिवसांची वन कोठडी..

कुडाळ,ता.०३:-
नेरुर तर्फ हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री. प्रताप महादेव आरोलकर यांचे मालकी क्षेत्रात बिबट वन्यप्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावरुन जागेवर जाऊन पाहाणी केली असता, सदर ठिकाणी शिकारीचे उद्देशाने तारेची फासकी लावल्याचे आढळून आले. सदर घटनेबाबत माहिती देणारे श्री. आरोलकर यांचे आंबा बागायत मध्ये काम करणारे मजूर यांचेकडे चौकशी केली असता, अनुप सुलेमान टेटे व राशल देवनीस डुंगडुंग यांनी सदरची फासकि ही आपण साळींदर या वन्यप्राण्याची शिकार करणेकरिता लावल्याचे सांगितले. आरोपी यांनी वन्यप्राणी शिकारीचे उद्देशाने फासकी लावून वनगुन्हयाचा भंग केल्याचे कबुल केले. त्यानंतर आरोपींची अंग झडती घेऊन आरोपींना अटक पंचनामा नोंद करुन अटक करणेत आली व याबाबत वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2, (16)b, 9, 39 (d) व 51 चा भंग केलेबाबत गुन्हा दाखल केला आहे.

दि.०२/०१/२०२५ रोजी आरोपी यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपी यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर प्रकरणी वनविभगाचे वतीने मा. नवकिशोर रेड्डी उप- वनसंरक्षक सावंतवाडी, मा. सुनिल सुनिल लाड सहा-वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी,
ती संदिप कुंभार वनक्षेत्रपाल

कुडाळ, दिनेश टिपुगडे वनपाल नेरुर त. हवेली, सावळा कांबळे वनपाल मठ, सचिन पाटील
वनरक्षक नेरुर, सुर्यकांत सावंत वनरक्षक मठ, विष्णू नरळे वनरक्षक तुळस, प्रसाद पाटील वनरक्षक आकेरी, शिवाजी पाटील वनरक्षक पुळास, अनिकेत माने वनरक्षक माणगांव, स्वप्नील सव्वाशे वनरक्षक वसोली यांनी वरील गुन्हयाचा तपास केला.

मालकी क्षेत्रामध्ये फासकि लावण्याच्या घटना वारंवार निदर्शनास येत असल्याने वनविभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करणेत येते की, आपले मालकी क्षेत्रात कोणीही फासकि लावल्याचे आढल्यास वनविभागास तात्काळ कळविणेत यावे. अन्यथा आपलेवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करणेत येईल याची नोंद घ्यावी. अशी माहिती (सं. श्री. कुंभार) वनक्षेत्रपाल कुडाळ तपासणी अधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top