राजू मसुरकर यांनी घेतली सावंतवाडी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांची घेतली भेट
सावंतवाडी,ता.०३:-
दोडामार्ग तालुक्यात शेतकरी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या आणि अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यू जबाबदार ठरणाऱ्या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी आज वन अधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकीशोर रेड्डी यांना दिले आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षात मोठ्या प्रमाणात सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात हत्तीमुळे नुकसान झाले आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी योग्य तो निर्णय घ्या. हत्तींचा योग्य तो बंदोबस्त करा, अन्यथा दाखल करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.