वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन.
कुडाळ,ता.०४:-
माणगाव येथील यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता सामंत उपस्थित होते यावेळी दत्ता सामंत यांनी या विद्यालयाच्या शैक्षणिक साहित्याची गरज लक्षात घेता शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी रोख 50 हजार रुपयाची देणगी या शाळेला दिली. व यापुढे आपण या शाळेला सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही देत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून आपले आणि या शाळेचे नाव उज्वल करावे असे उद्गार काढले.
यावेळी व्यासपीठावर दत्ता सामंत, अजित खैरे,डॉ योगिता राणे, सौ स्नेहल फणसळकर, संस्था अध्यक्ष सगुण धुरी,आनंद शिरवलकर, दीपक पाटकर मालवण नगरसेवक, श्री सचिन धुरी,महेश भिसे,बाळा जोशी, एकनाथ केसरकर, वि.न.आकेरकर, श्री साईनाथ नार्वेकर,श्री दत्त दिगंबर धुरी,विनायक नानचे, चंद्रशेखर जोशी श्पांडुरंग सावंत,बाळा आगलावे. विद्यार्थी पालक उपस्थित होते