बांदा
भाजपा खासदार नारायण राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या आगमनानिमित्त भाजपच्या वतीने बांदा येथे भव्य व जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर बांदा ते कणकवली अशी भव्य मोटारसायकल व वाहन रॅली आयोजित करण्यात आली असून, ही रॅली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी बांदा येथे पाहणी केली. यावेळी स्वागत व्यवस्था, रॅली मार्ग व नियोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळू सावंत, साई सावंत, मधु देसाई, गुरु सावंत, सुनील धामापूरकर, ज्ञानेश्वर सावंत, स्वप्नील सावंत, हुसेन मकानदार पांडुरंग नाटेकर, प्रवीण नाटेकर यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या रॅलीसाठी बांदा मंडलातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी दुपारी ३ वाजता बांदा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळीमनीष दळवी यांनी केले आहे.
