भोसले पॉलिटेक्निकला सलग तिसऱ्यांदा NBA मानांकन : शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब

सावंतवाडी प्रतिनिधी
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व कॉम्प्युटर या चार अभ्यासक्रमांना सलग तिसऱ्यांदा एनबीए – नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे. हे मानांकन १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी वैध राहणार आहे. यापूर्वी संस्थेला २०१९ व २०२२ मध्येही हे मानांकन प्राप्त झाले होते.

या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना कॉलेजचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले म्हणाले की, “हे मानांकन भविष्यात अधिक दर्जेदार, संशोधनाभिमुख व उद्योगपूरक शिक्षण देण्यासाठी आम्हाला नवी दिशा व प्रेरणा देणारे आहे. कॉलेजचे उपप्राचार्य व पॉलिटेक्निक इन्चार्ज गजानन भोसले यांनी सांगितले की, “ही कामगिरी संचालक मंडळ, विभागप्रमुख, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, उद्योगतज्ज्ञ व पालक यांच्या सामूहिक परिश्रमांचे फलित आहे.”

कॉलेजने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि.) तसेच प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी संस्थेचे उपप्राचार्य, डिप्लोमा विभागाचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या या राष्ट्रीय मानांकनामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण संस्थेत शिक्षण घेऊन उज्ज्वल करिअर घडविण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top