कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत,आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता
कुडाळ येथील ॲड.सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांसमवेत कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जमावबंदी आदेशाचा भंग करत आणि रीतसर परवानगी न…
