पंधरा दिवसांत पीक विमा भरपाई रक्कम जमा करा,युवासेना (उबाठा) च्या वतीने कृषी कार्यालयावर धडक
माणगाव खोऱ्यातील गोठोस मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरपाई रक्कम मिळाली नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी आक्रमक कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील पिंगुळी पंचक्रोशीतील व माणगाव खोऱ्यातील वाडोस मंडळ शेतकऱ्यांनाही अद्यापही पिक विमा रक्कम मिळाला नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विमा प्राप्त झाला नाही. अवकाळी पावसामुळे सध्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले…
