जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी:
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर भव्य महिला दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. आज दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सरमळे येथील रमाई नगर येथे चार हायस्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार आहे. माजगाव येथे ‘लॉरेन्स अँड मेयो’ यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभविक्रांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top