पीडित महिलांना वेश्याव्यवसायात ढकलल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

वेंगुर्ला प्रतिनिधी
पीडित महिलांना वेश्यागमनासाठी आणून ग्राहकांना पुरवल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संतोष मधुकर लुडबे (वय. ५२, रा. आजगाव) असे त्याचे नाव आहे. अन्नपूर्णा सेक्स वर्कर फाउंडेशन या संस्थेच्या नावाखाली तो वेश्याव्यवसाय चालवत होता. वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

सदरचा खटला मा. जिल्हा न्यायालयात अभियोग पक्षाच्या बाजुने सरकारी अभियोक्ता श्री. संदिप अशोक राणे, यांनी उत्कृष्टपणे चालविला. त्यामुळे तपासातील तांत्रीक व परिस्थीतीजन्य पुरावे मा. प्रधान जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश, डॉ. श्री. सुधीर देशपांडे यांनी ग्राह्य धरले व नमुद आरोपी यास भा.द.वि.क. 370 अन्वये दोषी ठरवुन 10 वर्षे सश्रम कारावास व 1,00,000/- रुपये दंडाची शिक्षा सुनावलेला असुन (दंडातील 50,000/- रुपये रक्कम पिडीतेस व 50,000/- रुपये रक्कम शासनास) जमा करणेबाबत आदेश दिलेले असुन दंड न भरल्यास 06 महिने साधा कारवास देण्यात आलेला आहे. तसेच सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 03 अन्वये 01 वर्ष सश्रम कारावास व 2,000/-रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 02 महिने साधा करावास देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सह स्त्रिया व मूली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 04 अन्वये 01 वर्ष सश्रम कारावास व 1,000/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 02 महिने साधा करावास देण्यात आलेला आहे.

माणे सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 05 अन्वये 03 वर्ष सश्रम कारावास

व 2,000/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 02 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सदर खटल्याच्या न्यायालयातील सुनावणीमध्ये अधिकारी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक श्री. राजेंद्र दळवी व पोलीस अंमलदार श्री. चंद्रकांत चव्हाण यांनी सरकारी अभियोक्ता यांना वेळोवेळी मदत केलेली आहे.

वरीलप्रमाणे अपराधी यांना झालेल्या शिक्षेच्या अनुषंगाने मा. डॉ. श्री. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. कुमारी नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी, पैरवी अधिकारी, सरकारी अभियोक्ता व गुन्हयाचे तपासास मदत करणारे तत्कालीन वेंगुर्ला पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top