‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून सावंतवाडीत पत्रकार दिन साजरा
सावंतवाडी“आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आणि सामाजिक परिवर्तनासाठी लेखणीचा जो वारसा सुरू केला, तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारांवर आहे. पत्रकारितेची मूल्ये आणि सत्यनिष्ठा जपतानाच, समाजाला पोखरणाऱ्या अमली पदार्थांसारख्या संकटांविरुद्ध आता पत्रकारांनी आपल्या लेखणीतून बुलंद आवाज उठवला पाहिजे,” असे प्रेरक आवाहन ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’च्या…
