भोसले पॉलिटेक्निकचा हिवाळी सत्र निकाल ९७% : मेकॅनिकल व सिव्हिल विभागाचा शंभर टक्के निकाल
सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी हिवाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (भोसले पॉलिटेक्निक) या संस्थेने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचा एकूण निकाल ९७ टक्के लागला आहे. यापैकी तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातून परीक्षेला बसलेल्या ५६ पैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा…
