सहाय्यक अभियंता श्री शेळके यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत ट्रान्सफॉर्मर नवीन बसविण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामस्थांना देण्यात आले
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावामध्ये विजेची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विज खंडिततेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.डोंगराळ आणि दुर्मिळ भागात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत आहे.ग्रामस्थांची नाराजी मोठी दिसून येत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर ला निधी मंजूर असताना विद्युत वितरण कंपनीकडून दिरंगाई होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माणगाव सहाय्यक अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माजी सरपंच तुषार परब,सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव,चंद्रशेखर परब,विजय परब आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक अभियंता श्री शेळके साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून सप्टेंबर महीना अखेरपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल.असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले.यावेळी केरवडे गावातील ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले
