हळदीचे नेरूर येथे वाघाचा म्हैशींच्या कळपावर हल्ला
कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने फडशा पाडला, एक जनावर जखमी झाले तर तीन जनावरे बेपत्ता झाली आहेत. ती अद्यापही घरी परतलेली नाहीत. त्या तिन्ही जनावरांचा नाईक कुटुंबीय स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेत आहेत….
