आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू:आमदार निलेश राणे

कुडाळ प्रतिनिधी
आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे डीपीआर ला मंजुरी मिळाल्यानंतर या आंजिवडे घाटाचे काम सुरू होईल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून फक्त टोप्या घालून आश्वासने देणाऱ्या माजी खासदार, माजी आमदार यांच्यासारखं आम्ही काम करत नाही आमच्यासमोर फक्त विकासात्मक दूरदृष्टी आहे असे त्यांनी माणगाव येथील विभागीय मेळाव्यात सांगितले या मेळाव्यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य व उबाठा सेनेच्या संघटक मथुरा राऊळ यांच्यासह काढलेली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
माणगाव येथे शिवसेनेचा विभागीय मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सचिव दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर, युवा मोर्चा जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, कुडाळ तालुका महिला प्रमुख वैशाली पावसकर, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी तसेच सचिन धुरी, दिनेश वारंग, राजन भगत, दत्ता कोरगावकर, पांडू सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य व उबाठा सेनेच्या संघटिका मथुरा राऊळ यांच्यासह कालेली ग्रामपंचायत सदस्य राजन शेळके, सानिका परब, संयोगिता सावंत, अंजली पेडणेकर तसेच शेकडो उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे स्वागत आमदार निलेश राणे यांनी केले.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात माणगाव खोऱ्यातील अनेक विकास कामे रखडली होती ही विकास कामे पूर्ण करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे करोडो रुपयांचा निधी या खोऱ्यासाठी आणला आहे लवकरच आंजीवडे घाट डीपीआर तयार करून तो देखील मंजुरीसाठी जाणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना कोल्हापूर जवळ होणार आहे तसेच शिवापूर ते शिरशिंगे या गावांना जोडणारा रस्ता होणार आहे अशी अनेक विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहेत सोनवडे घाट गेले अनेक वर्ष रखडला त्या ठिकाणी माजी खासदार टोपी घालून गेले पण त्याचा डीपीआर केला पाहिजे हे सुद्धा त्यांना माहिती नाही त्यामुळे त्या कामाला गती मिळाली नाही माजी आमदार यांनी सुद्धा फक्त टोप्या घालण्याचे काम केले त्यामुळे या भागाचा विकास रखडला आता मात्र या विकासाला चालना देण्याचे काम आम्ही करणार आहोत हे दोन्ही घाट रस्ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच माणगाव येथे उमेद ट्रेडिंग सेंटर, टेंबे स्वामी, यक्षिणी मंदिर या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्याचे प्रस्ताव सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी युवा सेना पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top