कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत क्षेत्र मर्यादित गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन फेरीमध्ये होणार आहे. पहिली फेरी ही वॉर्ड निहाय असणार आहे १७ वार्डमधील गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणरायांचे परीक्षण होणार आहे. या वॉर्डनिहाय स्पर्धेमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक काढले जाणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ३ हजार, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये २ हजार, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये १ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. वॉर्ड मधील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना अंतिम फेरीमध्ये म्हणजे दुसऱ्या फेरीत सहभागी करून घेतले जाणार आहेत आणि १७ वार्डातील १७ गणरायांचे परीक्षण करून यामधून पुन्हा तीन क्रमांक काढले जाणार आहे. या प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये १५ हजार व चषक द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये १० हजार व चषक तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये ५ हजार व चषक अशी पारितोषिके असणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवार २८ ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करावी. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी युवा सेनेचे शहर प्रमुख आबा धडाम (९४०४१६६८६८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे
