वेंगुर्ला प्रतिनिधी
भाजपा हा महासागर आहे.आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो,यातून भाजपची ताकद दिसून येते.आगामी कालावधीत होणाऱ्या नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार.भाजपा हा पक्ष हृदयात असल्याने शत प्रतिशत भाजपा रणनीती राबवून आयुष्यभर भाजपा पक्षासोबत राहणार,असे प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
