सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

वेंगुर्ले प्रतिनिधी
तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सुपूर्द केला. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, पदाधिकारी प्रशांत प्रभूखानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडणूक अर्जाच्या पाचव्या दिवशी तालुक्यात एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये मनीष दळवी यांच्यासह चंद्रहास उमेश पांडजी यांनी रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आजवर एकूण १६२ अर्जाची विक्री झाली असल्याची माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top