वेंगुर्ले शहरातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका प्रदान
वेंगुर्ला प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठीचा रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आज वेंगुर्ले भाजपा कार्यालयात भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस 20 सप्टेंबर २०२५ रोजी होत आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सातत्याने कार्यरत राहण्याचा मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आपल्या लाडक्या संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम व कार्यक्रम करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे आणि त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा उपक्रमातून रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे
