सिंधुपुत्राचा खान्देशात ‘डॉक्टरेट’ने सन्मान!

कुडाळ येथील बांबू उद्योजक संतोष राणे यांचा जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार!

कुडाळ प्रतिनिधी
युनियन बँकेचे माजी युनियन लीडर तथा सेवानिवृत्त बँक कर्मचारी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध बांबू उद्योजक आणि बांबू पिकाला व व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे कृषीप्रेमी संतोष शिवाजी राणे यांना रविवारी जळगाव येथील जैन हिल्स येथे आयोजित रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया द्वारा राष्ट्रीय अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ, अमरावती यांच्या वतीने ‘मानद डॉक्टरेट’ पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.
बांबू उद्योगाला शाश्वत विकासात्मक दृष्टिकोनातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. संतोष राणे यांना मान्यवरांच्या हस्ते सदर डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक हरिजन सेवक संघ, नवी दिल्ली यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर कुमार संन्याल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय क्षत्रिय महासभा दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर हरवंश सिंह, माजी राज्यसभा सदस्य नरेशचंद्र यादव, अखिल भारतीय लोधी व लोधा राजपूत महासंघ भोपालचे राष्ट्रीय अध्यक्ष रामगोपाल राजपूत, कम्युनिटी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज नवी दिल्लीचे अध्यक्ष अशोक मेहता, खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार मुंबई यांचे संचालक योगेश भामरे, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावचे अध्यक्ष व यशस्वी उद्योजक अशोक जैन, रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुई – खेडकर, समृद्ध विदर्भ समृद्ध भारत नवी दिल्लीचे अध्यक्ष गोविंद पोतदार, निकोलस शुज प्रायव्हेट लिमिटेड नोएडा उत्तर प्रदेशचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप कटियार, सुझकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक सुझान शंकर, अदिईरा इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड विरुधुनगर तामिळनाडूचे संचालक काथिकेयान दुराईराज यांसह रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. संतोष राणे यांनी २०२१ मध्ये युनियन बँकेच्या वरिष्ठ प्रबंधक पदावरून स्वेच्छ निवृत्ती घेत बांधू उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. आजवर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत बांबू व्यवसायला ग्लोबल दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मेहनत घेतली आहे. सिंधुदुर्गसह इतर जिल्हे आणि राज्यांमध्ये अधिकाधिक बांबू लागवड कशी करता येईल व शेतकऱ्यांना बांबू उद्योगासाठी कसे प्रेरित करता येईल, यासाठी सातत्याने त्यांनी शेतकऱ्यांचे उद्बोधन केले आहे. त्यांच्या ह्या एकूण कार्याची दखल घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट देण्यात आली आहे.

श्री. राणे यांच्या या अतुलनीय यशाबद्दल त्यांचे कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव ॲड. नकुल पार्सेकर बांबू, उद्योजक संजीव कर्पे तसेच कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे तमाम पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top