सावंतवाडीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा…

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडीत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदान जनजागृती अभियान निमित्त पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील यात सहभागी होत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. शहरातून ही पदयात्रा काढण्यात आली.जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथून या पदयात्रेस शुभारंभ करण्यात आला. तसेच सेल्फी स्टॅण्डचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शुभारंभकरण्यात आला. शहरातून मिलाग्रीस हायस्कूल चौक सालईवाडा रस्ता – जयप्रकाश चौक गांधीचौक मेनरोडने – नगरपरिषद कार्यालय समोरुन कॉलेज रोड, रामेश्वर प्लाझा मार्गे जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे समारोप झाला. यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. संपूर्ण पदयात्रेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, वैभव कुमार अंधारे आदींसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top