मालवण प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी शहराचा प्रभाग निहाय दौरा करून नागरिकांशी हितगुज केले. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने हे सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही देताना नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांचा विजय निश्चित असून पालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
