लवकरात लवकर प्रश्नांवर तोडगा काढला जाईल:नगराध्यक्ष संदेश पारकर
कणकवली प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग संघटनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणी ने कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष श्री पारकर यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू.त्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून शहराच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले
यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज तोरस्कर, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश बांदेकर, कार्यकारी सदस्य प्रविण गायकवाड, मनोज वारे, चंद्रकांत शेट्ये, राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते
समस्या बाबत चर्चा कणकवली शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव कमी करणेकामी निर्बिजीकरण करण्यासोबतच ॲनिमल शेल्टर ची उपाययोजना करणेत यावी.
२) शहरातील मोकाट गुरांचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत उपाययोजना करण्यात यावी.
३) शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करणे कामी महामार्ग प्राधिकरणस सुचित करण्यात यावे.
४) शहरातील नियोजन शुन्य व वाढीव स्टॉलधारकांबाबत योग्य उपाययोजना करण्यात याव्यात
५) आप्पासाहेब पटवर्धन चौकातील बेशीस्त पार्किंग बाबतीत नगरपंचायत स्तरावरुन संबंधित विभागास सुचना द्याव्यात
६) कणकवली..नरडवे रस्त्यावरील संध्याकाळी होत असलेल्या मच्छी विक्रेत्यांना अस्वच्छता न करणे तसेच वाहतूकीस अडथळा न करणे बाबत सुचना द्याव्यात.
