गुळनिर्मिती उद्योगामुळे अर्थकारणाला चालना: पालकमंत्री नितेश राणे

वैभववाडी
अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड, नाधवडे वैभववाडी यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती प्रकल्पाच्या मोळी पूजन व लोगो अनावरण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला गुळ निर्मिती उद्योग ही अभिमानास्पद बाब आहे. अशा प्रकल्पांना माझे संपूर्ण सहकार्य असून या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल. जिल्ह्यातून तरुण पिढीचे होणारे स्थलांतर थांबवायचे असेल तर जिल्ह्यात उद्योगधंदे निर्माण व्हायला पाहिजेत यासाठी स्थानिक तरुणांनी उद्योगाच्या माध्यमातून पुढे यावे असे आवाहन यावेळी केले. या कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक श्री.दिलीप रावराणे, पणन महासंघाचे संचालक श्री.प्रमोद रावराणे, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top