प्लास्टिक द्या अन् साखर घ्या! – ग्रामपंचायत मळेवाड – कोंडूरेचा अभिनव उपक्रम!

सावंतवाडी

तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता प्लॅस्टिक द्या साखर घ्या असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता प्लास्टिक दया,साखर घ्या हा उपक्रम सुरू केला असून याचा शुभारंभ राणी पार्वती देवी विद्यालय, मळेवाड जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ येथे सरपंच सौ.मिलन पार्सेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बॉटल,प्लास्टिकचे वस्तू हे शाळेमध्ये जमा करावयाचे असून प्रत्येक विद्यार्थी जेवढे प्लास्टिक गोळा करेल त्यानुसार सदर विद्यार्थ्याला साखर देण्यात येणार आहे. या प्लास्टिक कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचे तुकडे प्लास्टिकची खेळणी प्लास्टिकच्या बाटल्या असा समावेश असलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात येणार आहे. तसेच गावातील ज्या शाळेमध्ये सर्वाधिक जास्त प्लास्टिक गोळा होईल त्या शाळेकर्ता सामूहिक सांघिक बक्षीस म्हणून रोग रक्कम सन्मानचिन्ह व सन्मानपत्र या ठिकाणी देऊन ग्रामपंचायत कडून गौरविण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली. तसेच हा उपक्रम गावातील ग्रामस्थांसाठी ही करण्याचा मानस असल्याचे उपसरपंच मराठे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे गावातील प्लॅस्टिक कचरा हा गोळ्या होण्यासाठी मदत होणार आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला गाव कचरामुक्त होण्यासाठी या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि गावाच्या स्वच्छतेला हातभार लावावा असे आवाहन सरपंच सौ मिलन पार्सेकर यांनी केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, सानिका शेवडे, मुख्याध्यापक शितल वेंगुर्लेकर, शिक्षक संजय बांबुळकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रिया नाईक,उपाध्यक्ष दीया चौगुले प्रभाकर पार्सेकर, संतोष पार्सेकर, भाऊ मुरकर, भाऊ काळोजी तसेच महिला पालक, ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान असा अभिनव व स्तुत्य उपक्रम राबविणारे मळेवाड – कोंडूरे पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top