कळसुलकर इंग्लिश स्कूलचा युवराज धुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटातून प्रथम

सावंतवाडी विज्ञान मंडळ, रवी नगर, नागपूर यांच्या उपक्रमांतर्गत आयोजित ५३ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५ नुकतेच संस्कार इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, निरवडे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्या एज्युकेशन, मुंबई, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती, सावंतवाडी आणि तालुकास्तरीय सिंधुदुर्ग विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक ३ डिसेंबर व गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनात कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या कुमार युवराज संदीप धुरी याने मोठी कामगिरी केली. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या युवराजने विद्यार्थी प्रतिकृती दिव्यांग गटातून सहभाग घेत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (Rain Water Harvesting) या प्रतिकृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले आणि प्रथम क्रमांक पटकावला.

युवराजच्या या यशाबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेचे मुख्याध्यापक एस.व्ही. भुरे, पर्यवेक्षक एस.एस. वराडकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे आणि मार्गदर्शक श्रीमती एस.यू. बांदेलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

युवराज धुरी याला आता पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top