भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा कार्यकर्त्यांसह “मन की बात” कार्यक्रमात सहभाग

सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात केले भव्य नियोजन

सावंतवाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेसोबत या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम सोबत सहभागी होत पाहिला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व जनता या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि त्याची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचावेत यासाठी संपर्क कार्यालयात प्रक्षेपण कार्यक्रमाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे यावेळी श्री विशालजी परब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top