सावंतवाडी प्रतिनिधी
रेडी येथे श्री. रामसिंग राणे (सरपंच) पुरस्कृत ‘सरपंच चषक 2026’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांना नवी ऊर्जा, दिशा आणि एकात्मतेची प्रेरणा मिळते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास प्रितेश राऊळ (जिल्हा परिषद सदस्य), रामसिंग राणे (भाई राणे, सरपंच), आनंद भिसे (उपसरपंच), सागर रेडकर (ग्राम सदस्य), सागर राणे, A.T. राणे, गोपाळ राऊळ तसेच रेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशालजी परब यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या निमित्ताने गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
