नेरूर ठाकुरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेतील अतिक्रमण हटवा

ग्रामस्थांसाठी रस्ता मोकळा करून द्यावा-मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांची मागणी

कुडाळ प्रतिनिधी
गेले दोन-तीन महिन्यापासून नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या जागेमधील रस्त्यावर अवैधरित्या झाडे लावून तसेच अनधिकृत गोठा बांधून अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणामुळे ठाकुरवाडीतील ग्रामस्थांना आपल्या राहत्या घरामध्ये तसेच शेतामध्ये जाणे येणे मुश्किल झालेले आहे. एखादी आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती उद्भवल्यास या ठिकाणावरून रुग्णास तात्काळ घालवण्यासाठी ॲम्बुलन्स जाणे सोडा माणसांकरवी उचलून पण आणता येणे शक्य नाही अशी परिस्थिती आहे असताना. येथील ग्रामस्थ केले दोन-तीन महिने प्रशासनाच्या दारावर न्यायाची याचना करत असून सुद्धा अद्याप पर्यंत प्रशासनाकडून काहीच कारवाई झालेली नाही. गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रांताधिकारी व शाळा प्रशासन यांनी सुरुवातीला झालेले अतिक्रमण काढून रस्ता खुला देखील केला होता परंतु काही समाजकंटकांनी पुन्हा जबरदस्तीने तो रस्ता अतिक्रमण करून बंद केलेला आहे आणि यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना सुद्धा प्रवेश करणे अत्यंत कठीण आणि कसरतीचे झालेले आहे. त्या सर्वांचा विचार करता प्रशासनामार्फत येत्या दोन दिवसात योग्य कारवाई होऊन रस्ता खुला न झाल्यास मनसे वेळ पडल्यास कायदा हातात घेऊन ग्रामस्थांच्या बाजूने रस्त्यावर उतरून सदरचे अतिक्रमण पाठविणार आहे आणि यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top