उद्या ‘अशी’ होणार मतमोजणी!

सावंतवाडीत जि.प., पं. स. मतमोजणीचे नियोजन जाहीर.

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत सावंतवाडी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी गट व गणनिहाय मतमोजणीचे नियोजन प्रशासनाने जाहीर केले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक गटासाठी स्वतंत्र गण व टेबल क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत.
माडखोल, आंबोली, कोलगाव, तळवडे, माजगाव, इन्सुली, मळेवाड, आरोंदा आदी गटांतील गणांची मतमोजणी ठरावीक टेबल क्रमांकांवर होणार आहे. माडखोल गटासाठी माडखोल व कलंबिस्त या गणांची, आंबोली गटासाठी आंबोली व विलवडे गणांची, तर कोलगाव गटासाठी कोलगाव व कारिवडे गणांची मतमोजणी करण्यात येणार आहे.
तसेच तळवडे गटात तळवडे व मळगाव, माजगाव गटात माजगाव व चराठे, इन्सुली गटात इन्सुली, मळेवाड गटात मळेवाड व न्हावेली, तर आरोंदा गटात आरोंदा, सातार्डा, बांदा व तांबोळी या गणांचा समावेश आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी १ ते १७ असे टेबल क्रमांक निश्चित करण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top