सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी आर.पी.डी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी या परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे.
चालू वर्षी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी (चेकिंग) केली जाणार आहे. त्यामुळे सर्व परीक्षार्थींनी परीक्षेपूर्वी किमान पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सकाळच्या सत्रात १०.३० नंतर तसेच दुपारच्या सत्रात २.३० नंतर येणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
या परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे –
विज्ञान शाखा: W007130 ते W007449
वाणिज्य शाखा: W021471 ते W021760
कला शाखा: W013913 ते W014108
तांत्रिक (टेक्निकल) शाखा: W023902 ते W400081
या केंद्रावर एकूण ८२० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व परीक्षार्थींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रप्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना केले आहे.
