चौकुळ येथे पिसई शिकार प्रकरणी दोघे ताब्यात

आंबोली
चौकुळ खमदा परिसर येथे रात्री एका पिसई ची शिकार करून ऍक्टिवा गाडीमध्ये ठेवून चौकुळ रस्त्यावर बसले असताना रात्री गस्त घालताना शिकारी आयते जाळ्यात सापडले. वनविभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.बुधवारी रात्री चौकुळ खमदा परिसर येथे एक पिसई ची शिकार करून काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडी मध्ये घालून मुख्य रस्त्यावर रात्री निवांत बसले होते. रात्री दीड वाजता वन क्षेत्रपाल प्रमिला शिंदे, वनपाल् चौगुले, वनरक्षक खोत हे गस्त घालत असताना रात्री दीड वाजताना त्यांना दोघे आढळून आले. त्यांनी गाडी थांबवुन बघितले असता गाडी च्या फुट रेस्ट वर रक्त लागलेले होते. आत डिकी उघडून बघण्यासाठी सांगितले असता आत एक पिसई आढळून आली. या प्रकरणी तुषार गुंजाळ, रा. वसोली, परशुराम राऊळ, रा. मळगाव यांना बंदूकीसह ताब्यात घेऊन वन्य प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top