कणकवली
युवतीचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तत्पूर्वी तिच्यावर कणकवली येथील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी युवतीचे नातेवाईक, ग्रामस्थ व इतरांनी १४ डिसेंबर रोजी युवतीच्या मृत्यूस जबाबदार धरत त्या हॉस्पिटलमध्ये जाब विचारला होता. यावेळी हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. या तोडफोडप्रकरणी सुमारे ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दहाजण आतापर्यंत निष्पन्न झाले असून संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अमोल महादेव राणे (३०), तेजस रवींद्र भांबुरे (३०), नैनेश शशिकांत बंड (४३), ४३). नितीन उर्फ पप्या चव्हाण नारायण लाड (५५), दर्पण शनेश राणे (२४), सुनील गोविंद साईम (४०), गजानन हिरु राठोड (३२, सर्व रा. कासार्डे), भरत भगवान चव्हाण (३८, दारोम), विठोबा कृष्णा माळवदे (४०, तळेरे), रिमेश (कलमठ) यांचा समावेश आहे.
