सावंतवाडी
सावंतवाडी शहरात भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार आज भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी मंत्री नितेश राणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य नियोजन व पारदर्शक कारभार करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मंत्री नितेश राणे यांनी सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. सावंतवाडीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
