कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंचा आत्मविश्वासपूर्ण इशारा.
कणकवली
“राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो.माझ्या विरोधात सर्व करून झाले.मात्र असे विरोध करणारे सर्व थकले. मी कोणाला घाबरत नाही. तुमची ही उपस्थिती,तुमचे स्वागत आणि प्रेम पाहून मी भारावून जातो.राणे विरुद्ध राणे होणार नाही. राणे एक संघ आहेत.पक्ष वेगळे असले तरी राणे वेगळे होणार नाहीत.कार्यकर्त्यांनी डगमगायचे नाही. मी समर्थ आहे. असा विश्वास लोकनेते,भाजपनेते, कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांनी दिला. कणकवली येथे कार्यकर्त्यांनी उस्फूर्तरीत्या भरवलेल्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार राणे यांच्या उपस्थितीत प्रचंड जनसागराकडून घोषणाबाजी करत नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है …!, अशा जय जयकार करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
खासदार नारायण राणे म्हणाले ” जिल्हयात राजकारणाला थारा देवू नका. माझ्या रस्त्यात आलात तर थारा देणार नाही. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक व्हा.”
हा मेळावा आयोजित करायची वेळ का आली. कोणामुळे आली. कशासाठी आली. मी बीजेपी मध्ये प्रवेश केला त्याच वेळेला एक वाक्य मी सांगितलं मी माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष आहे.येथेच याच पक्षात काम करत राहणार.त्यामुळे चर्चा करायची काही गरज नाही. मात्र जगावं ती स्वाभिमानाने ही माझी वृत्ती आहे.
ईश्वराने जन्माला जे घातलं ते पदासाठी घातक आहे की काय असे नेहमी वाटते. एवढी पदे भूषविली.त्या पडला न्याय दिला. जनतेला मदत केली. हे माझ्यासाठी नाही, माझे ध्येयासाठी मी काम केले जनतेसाठी त्यांच्या विकासासाठी केले. अनेक पदे मिळविली मी शिवसैनिक झालो आणि वर्षभरात नगरसेवक झालो, मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक झालो चेअरमन झालो. १९९० मध्ये मी कार्यकर्ते,जनता,आणि देवांच्या आशीर्वादाने मी कणकवलीचा आमदार झालो.मला संधी मिळाली तर जिल्ह्यातील गरिबी ठेवणार नाही. असा त्यावेळी संकल्प केला होता. त्यात मी यशस्वी झालो आहे.३१ मार्च २०२६ पर्यंत तीन लाख दरडोई उत्पादन येथील जनतेचे करायचे आहे. असे सुख येथील जनतेला निर्माण करून द्यायचे.
मी कोकणासाठी वेडा आहे. जन्म गाव, येथील निसर्ग, माणसांसाठी वेडा आहे.मी लिहून देतो मला कोणतेही पद नको.मला फक्त येथील जनता हवी हीच माझी संपत्ती आहे. मला राजकारणातून सोडा असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा साहेब यांना सांगितले होते तर त्यांनी नाही सोडणार म्हणून सांगून खासदारकी दिली. आता मी दहा पदे मिळाली. ही तुमची जनतेची, देवाचे आशीर्वाद आहेत.
मी कोणापेक्षा कमी आहे, असे वाटत नाही. मी कमी नाही.मी कधीच कुठे कमी पडत नाही.
मी नेता आहे. मी ९० नंतर सिंधुदुर्गा मध्ये विकास आणला. रस्ते आणि वाहतूचे जाळे विणले.आता काही नेते येऊ पाहत आहेत. मी धरणांची कामे सुरू केली आणि पाणी टंचाई दूर केली. धरण मंजूर करून पूर्ण केलेले एक तरी नेता दाखवा. फक्त मी कामे पूर्ण केली.
राणे कडून दूर व्हा म्हणून कोटी कोटी वाटले जातात. मात्र माझे कार्यकर्ते असे नाहीत ते निष्ठेने माझ्यासोबत राहिले. तुम्ही सुद्धा पक्ष सांभाळा, निष्ठावंत व्हावा. मला स्वार्थी लोक नको. मी स्वार्थी लोक जोपासले नाहीत. होते ते गेले आणि आता दारोदारी ठोकरे खात आहेत. तुमच्यावमुळे माझ्यासोबत एवढी जनता राहिली आहे. कार्यकर्ते राहिले. माझे कार्यकर्ते पैसे घेत नाहीत याचे उदाहरण देताना शरद कर्ले यांचे दिले. आपल्या निवडणुकीत काम करण्यासाठी पैसे घेत नव्हते त्यांनी प्रेमापोटी काम केले. आपल्याला जनतेसाठी काम करायचे आहे. छोट्या बालकांसाठी येणाऱ्या पिढीसाठी काम करायचे आहे.
शैक्षणिक क्षेत्रात किती पुढारी माणुसकी हेच माजे ध्येय.
देवाकडे प्रार्थना माणुसकी कायम ठेव. मदत करण्याचे टाकत ठेव. मी जो प्रवास केला त्यात कोणाची मदत नाही बऱ्याच लोकांनी आडवे येण्याचे काम केले.राजकारणातील कारस्थाने तेव्हा आणि आतही अडचणी आलीत. त्यांना एक शब्द सांगितला नांदा संध्या..
निलेश, नितेश यांचे काम चांगले ..
माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद द्या. त्यांना पैशाची गरज नाही. आशीर्वाद द्या. सहकार्य द्या.
आमचे दुश्मन कोण नाही. काही होते ते इकडे तिकडे गेले अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. मी कोणाचे कधीच वाईट केले नाही. कोकणच्या मातीने निसर्गाने मला घडवले. मी साहेब नाही मी सेवक आहे. तुम्ही माझे मित्र आहात.
माझ्या बाळाला कसलीही भीती असणार नाही.
जम्मू काश्मीर मध्ये मी धोक्याचे आयुष्य पूर्ण केले पैशासाठी राजकारण करू नका. निर्धार करा आणि चागल्या मार्गाने पैसे मिळवा. मी कधीही वास्तव सोडून गेलो नाही. मी एकही गोष्ट खोटी केली नाही. आणि कोणाला फसवले नाही.
जीवदान दे असे बाळासाहेबांनी मला सांगितले आणि त्याला जीवदान दिले. नारायण राणे एका वेळेत संपणार नाही.
माझ्या गाडीत दादा…
माझी काळजी वाटणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यानी उत्स्फूर्त मिळावा लागलेला आहे. तुमच्यामुळे मी आहे. हे श्रेय तुमचे आहे. मी असे पर्यंत आणि माझ्या पाठीमाणे नितेश निलेश आहेत ते तुम्हाला सपोर्ट करतील. सर्वतोपरी मदत करतील. आज माझा जोश वाढविला, प्रेरणा दिली. उत्तेजन दिले.
कोणीही मतभेद करण्याचा प्रयत्न करू नका. पक्ष वाढेल. भाजपा एकच पक्ष देशात, राज्यात टिकेल. भांडणं, लावलावी करू नका.पैशाने माणसं मिळविता येत नाही. ३६ वर्षात एकही कार्यकर्ता माझ्या समोर दारू आणि सिगारेट पिऊन आला नाही. पट,जुगार बंद केले. सर्वांच्या प्रेरणेने हा मेळावा आहे.
काही गेले ते वणवण भटकत आहेत. मोदी,अमित शहा , काम करत आहेत.
जनतेसाठी उपक्रम सुरू केले आहेत. एकही माणूस उपाशी राहणार नाही असे धान्य पुरवठ्याचे मोफत रेशन देशभर वाटले जात आहे.
तुमच्याशी बोलून गेल्यावर ठणठणीत होणार…माझ्या बद्दल तुम्ही जे बोलतास तसा मी आहे की नाही माहीत नाही मात्र मी तसा होण्याचा प्रयत्न करेन..
निलेश,नितेश यांचेसह संपूर्ण कुटुंबावर प्रेम करणारे तुम्ही आहात. सर्वजण माझ्यावर प्रेम करता त्यावर आभारमान्यासाठी शब्द नाही मात्र रामेश्वर तुम्हाला चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना..
माझे दोन्ही मुलगे निलेश-नितेश तुम्हाला साथ देतील!
द्वेषाच्या राजकारणाला मी थारा देणार नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती आहे. सिंधुदुर्गच्या मातीनं मला घडवलं आहे. इथल्या लोकांच्या प्रेमानं मी घडलो. माझा कार्यकर्ता हा माझा घरचा सहकारी मानतो. पैशांसाठी राजकार करू नका. मेहनतीन पैसा कमवा, असले पैसे पचत नाही, फळत नाही. व्यवसाय करा मेहनतीतून पैसे कमवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी कुणाला फसवलं नाही, खोटं बोललो नाही. माझ्या जीवनात यशस्वी झालो याच श्रेय जनतेला आहे. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला साथ देतील. ते देणारे आहेत, घेणारे नाहीत. मतभेद, फितूरी पक्षात करू नका. मी कुणाला गाडी, पैसे दिले नाही. मात्र, प्रेमानं माणसं जिंकली म्हणून आज असे मेळावे माझ्यासाठी होतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा १२ तास काम करतात. त्यांचा आदर्श घेऊन काम करा असं आवाहन केलं.
