वेर्ले येथील मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे विशाल परब यांच्याकडून सांत्वन

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे महिनाभरापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वेर्ले येथील एका तरुणाचा अकाली मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे वेर्ले परिसरावर शोककळा पसरली असून, एका कुटुंबाचा आधारवड हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप युवानेते विशाल परब यांनी नुकतीच मृत तरुणाच्या निवासस्थानी भेट देऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

ओवळीये येथील त्या दुर्दैवी घटनेला महिना उलटला असला तरी, तरुण मुलाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि कुटुंबावर आलेले संकट मोठे आहे. ही बाब लक्षात घेऊन विशाल परब यांनी वेर्ले येथे जाऊन मृताच्या पालकांशी व नातेवाईकांशी संवाद साधला. “या कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशा शब्दांत त्यांनी कुटुंबाला धीर दिला.

यावेळी विशाल परब यांच्यासोबत स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top