कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा १३ जानेवारीला…

उपनगराध्यक्ष पदाची देखील होणार निवड…

कणकवली
महाराष्ट्र नगरपरिषदा
नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा. कणकवली नगरपंचायत येथील परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिलेल्या नोटीसनुसार, अधिनियमाच्या कलम ५१ अ-१ अ च्या पोटकलम (९) अन्वये ही सभा बोलावण्यात येत असून, या सभेत नगरपंचायतीच्या महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींवर कार्यवाही होणार आहे.या पहिल्याच सर्वसाधारण सभेत कलम ५१ अ च्या पोटकलम (६ अ) अन्वये कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर कलम ०९ च्या पोटकलम (१) खंड (ब) तसेच कलम ५१ अ-१ अ च्या पोटकलम (९) अन्वये नगरपंचायत सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात येणार आहे.उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रमही जाहीर करण्यात आला असून, नामनिर्देशन, छाननी, नामनिर्देशन मागे घेणे तसेच आवश्यकता असल्यास मतदान व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया मंगळवारी १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी पार पडणार आहे.नगरपंचायतीच्या नव्या कार्यकाळातील ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने, या सभेकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top