महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रीकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडी मार्फत सत्कार

महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान:नगराध्यक्ष राजन गिरप

वेंगुर्ला प्रतिनिधी

भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रिकेट संघ वेंगुर्लेवासीय स्मिता गावडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सिंधुदुर्गातील तीन खेळाडुंच्या सहभागातून ” उमंग राष्ट्रीय ट्रॉफी २०२५” जिंकली त्याबद्दल भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मध्यप्रदेश भोपाळ येथे उमंग गौरवदिप वेल्फेअर सोसायटी तर्फे उमंग राष्ट्रीय दिव्यांग महीला क्रिकेट कप २०२५ चे आयोजन ओल्ड चॅम्पियन्स मैदानावर करण्यात आले होते. अंतिम सामन्यात झारखंड राज्याला पराभूत करून महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय मिळवला.

महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता सुनिल गावडे हिने संघाचे नेतृत्व केलेल्या संघात सिंधुदुर्गातील शिल्पा गांवकर (आचरा -मालवण), दिक्षा तेली (देवगड) यांचा समावेश ना सिंधटर्गातील तीन दिव्यांग महिलांनी योगावर मात करुन क्रीडा प्रकारात अग्रेसर आहोत हे दाखवुन दिले. तसेच महाराष्ट्राचे
प्रतिनिधीत्व करुन चॅम्पियन ट्रॉफी आपल्या राज्याला मिळवुन दिली याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, सहसंयोजक श्यामसुंदर लोट व प्रकाश वाघ, नगरसेवक सुधीर पालयेकर, सुनिल घाग, ललित गावडे, साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा रुपाली पाटील, दिव्यांग विकास केंद्र उपाध्यक्ष अस्मिना मकानदर, सचिव प्रणिता पेंडसे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top