कुडाळ
तालुक्यातील माणगांव डोंगरवाडी येथे दिनांक १२ जानेवारी रोजी प.पु. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या पादुकांचे विधीवत पूजन, सत्यदत्त पूजा, महाप्रसाद, तसेच अखंड नामस्मरण अशा भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याला श्री ओमकार कुंभार यांच्या सुश्राव्य गायनाची विशेष साथ लाभणार असून, परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून जाणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडणार आहेत.
या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
निमंत्रक : बाबी म्हाडेश्वर, भिवा म्हाडेश्वर, समीर म्हाडेश्वर.
